प्रेरणा बॅंकेतर्फे तेरा टक्‍के लाभांश जाहीर

पिंपरी – प्रेरणा को ऑपरेटिव्ह बॅंकेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा थेरगाव येथे पार पडली. यामध्ये बॅंकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर यांनी सभासदांना तेरा टक्‍के लाभांश जाहीर केला. बॅंकेची निगडी शाखा येत्या सप्टेंबरमध्ये सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रघुनंदन मंगल कार्यालय येथे कांतीलाल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. याप्रसंगी उपाध्यक्ष गबाजी वाकडकर, संस्थापक तुकाराम गुजर, प्रेरणा बॅंकेचे संचालक श्रीधर वाल्हेकर, लक्ष्मण काटे, अंकुश पऱ्हाड, सुरेश पारखी, संजय पठारे, संतोष मुंगसे, संदीप पवार, राजाराम रंदील, मीना शेळके, सुजाता पारखी, उमेश आगम, राजेंद्र शिरसाठ, तज्ज्ञ संचालक नंदकुमार तोष्णीवाल, चंद्रभागा भिसे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेच्या प्रगतीचा आढावा घेताना कांतीलाल गुजर म्हणाले की, वर्षात चार नवीन शाखा सुरू झाल्या असून बॅंकेचा व्यवसाय 500 कोटी इतका झाला आहे. सध्या 14 शाखा कार्यरत असून निगडी शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. नेट एनपीए शून्य टक्‍के असून मोबाईल बॅंकींग लवकर सुरू करणार आहे. शून्य टक्‍के एनपीएसाठी सलग दहा वर्ष पुणे जिल्हा बॅंक फेडरेशनकडून तसेच महाराष्ट्र राज्य बॅंक फेडरेशन मुंबईकडून दुसरा क्रमांक पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रथम क्रमांकाचा 2017-2018 बॅंको पुरस्कार प्राप्त झाला आहे. सभासदांसाठी लॉकर सुविधा, कोअर बॅंकिंग, आरटीजीएस, एनई एफटी, तसेच एसएमएस सुविधा सुरू आहेत. युवा वर्गासाठी लवकरच मोबाईल बॅंकिंग सुविधांवर भर देऊ असे सांगितले. सहकारात सांघिक भूमिकेतून केलेले काम संस्थेच्या वाढीस व प्रगतीस फायदेशीर ठरत, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बॅंकेच्या ज्या सभासदांचे वय 74 वर्षे पूर्ण झाले त्यांना अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण म्हणून मानपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये खंडु झिंजुर्डे, मुक्ताबाई पारखी, भिमाबाई साखरे,जालिंदर कस्पटे, हनुमंत नेवाळे, बारकु मुंगसे, रेणुबाई भोंडवे, दत्तात्रय घारे, परमेश्वर भेंडगेव्हे, यमुना चोंधे, बलजितसिंग सैनी, सिदूराम वाग्गा, विठ्ठल बहिरट यांचा समावेश होता. ज्या सभासदांचे वय 60 वर्षे पूर्ण झाले त्यांना एकसष्टाव्या वर्षात पदार्पण म्हणून प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार देऊन 88 जणांना गौरविण्यात आले. श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. सभेचे विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय उबाळे यांनी केले. अंकुश पऱ्हाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)