प्रेरणा: “प्रथम’चे प्रशंसनीय काम 

दत्तात्रय आंबुलकर 
“प्रथम’ या ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना प्राथमिक अभ्यासक्रम स्तरावर शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या मुख्याधिकारी म्हणून काम करणाऱ्या रुक्‍मिणी बॅनर्जी यांनी आपल्या कामगिरीचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला आहे. सन 2005 पासून “प्रथम’ या ग्रामीण क्षेत्रातील शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात बॅनर्जी यांनी केली. “ऍन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट’ या शैक्षणिक अहवालानुसार, 14 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना भागाकार जमत नाही. त्यातील निम्म्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचे प्राथमिक ज्ञान पण नाही. हे वाचून बॅनर्जींनी गरजू विद्यार्थ्यांना अत्यावश्‍यक शिक्षण देण्याचा ध्यास घेतला.
त्यांच्या मते त्यावेळी अशा प्रकारचा प्रयत्न आणि उपक्रम पहिल्यांदाच केला जाणार असल्याने त्यांनी आपल्या या शैक्षणिक पुढाकाराला “प्रथम’ असे सार्थ नाव ठेवले. बॅनर्जी यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण पोहोचवता आले. त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा मुद्दा प्रकाशझोतात आला. एवढ्या मोठ्या संख्येत गरजू विद्यार्थी शिक्षणाला सर्वस्वी पारखे राहिल्याने त्यांची गरज समाजाला समजली व त्याला थोड्या प्रयत्नांती पण सातत्यपूर्ण प्रयत्नाने चांगला प्रतिसाद मिळू लागला.
“प्रथम’चे काम सुरू केल्यानंतरच्या प्रथम टप्प्यातच रुक्‍मिणी बॅनर्जी यांना देशांतर्गत विशेषतः प्राथमिक-माध्यमिक शालेय अभ्यासक्रम, हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी आवश्‍यक अशा शाळा व शिक्षक आणि ग्रामीण विद्यार्थी यांच्यामधील भीषण दरी व तफावत लक्षात आली. त्याला सामाजिक प्रयत्न आणि पुढाकाराचे पाठबळ आवश्‍यक असल्याचे त्यांना प्रकर्षाने जाणवले. असे सामाजिक पाठबळ मिळवितानाच या शैक्षणिक उपक्रमामागची कृतिशील प्रेरणा असणाऱ्या रुक्‍मिणींनी निवडक क्षेत्रातील शाळेपासून नेहमीच दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि ज्ञान यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अल्पावधीतच फळ मिळत गेले. यासाठी शिक्षणाला केवळ पुस्तकी अभ्यासक्रमापुरतेच सीमित न ठेवता त्याला व्यावहारिक ज्ञानाची जोड मोठ्या प्रयत्नपूर्वक दिली. यामुळे शिक्षणापासून नेहमीच अंतर राखणाऱ्या ग्रामीण-गरीब विद्यार्थी व शैक्षणिक ज्ञान यामध्ये अर्थातच संतुलन निर्माण झाले.
“प्रथम’च्या शिक्षण पद्धतीत शैक्षणिक शिबिरांना अगदी सुरुवातीपासूनच महत्त्वाचे स्थान देण्यात आले. दहा दिवसांच्या निवासी शैक्षणिक शिबिरांच्या माध्यमातून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सुमारे 70 ते 75% विद्यार्थ्यांना भाषा व गणिताचे ज्ञान व प्रचलित प्राथमिक व्यवहारी ज्ञान अवश्‍य प्राप्त होते. या शिबिरांवर “प्रथम’चा आजही भर आहे.
आपल्या मोहिमेसाठी जिद्दीने प्रयत्न करणाऱ्या बॅनर्जींच्या “प्रथम’ला मिळालेले यश पाहता सरकारदरबारीपण उत्स्फूर्तपणे सहकार्य मिळाले. “प्रथम’च्या उपक्रमाची अंमलबजावणी जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हिमाचल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगडंमध्ये आता सरकारी स्तरावर होत असून 60 लाख ग्रामीण विद्यार्थी त्याचे लाभार्थी ठरले आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)