प्रियांका गांधी एक्का तर, राहुल गांधी जोकर- सरोज पांडे

नवी दिल्ली: सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नेत्या सरोज पांडे यांनी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची चांगलीच खिल्ली उडवली असून, या दोघांना ‘जोकर आणि एक्क्याची’ उपमा दिली आहे. प्रियांका गांधी काँग्रेसच्या हुकमी एक्का आहे, असे सांगण्यात आले होते, मात्र त्या हुकमी एक्का असतील तर राहुल गांधी ‘जोकर’ आहेत. अशी टीका सरोज पांडे यांनी केली आहे.

प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातल्या सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आल्या नंतर, भाजपने प्रियांका गांधींवर जोरदार टीका सुरु केल्या आहेत. आता पुन्हा एकदा भाजपकडून प्रियंका गांधींवर निशाणा साधण्यात आला. जर प्रियांका गांधी एक्का असतील तर त्यांना राजकारणात या पूर्वी का आणलं गेलं नाही. असा देखील प्रश्न सरोज पांडे यांनी उपस्तिथ केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1089837532118900737

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)