सेलिब्रिटी कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी ‘नच बलिये’ च्या नवव्या सीझनमध्ये आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत, पण आता त्यांची नृत्यदिग्दर्शिका ऐश्वर्या राधाकृष्णन शोमधून बाहेर पडली आहे.
“वैयक्तिक कारणांमुळे मी ‘नच बलिये’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मला या शोचा भाग असण्याचा आनंद मिळाला. मला वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. आयोजकांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानू इच्छिते, असे तिने म्हटले आहे. ‘नच बलिए’ शिवाय या 27 वर्षीय कोरिओग्राफरने “सो यू कॅन थिंक यू कॅन डान्सः अब इंडिया की बारी’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘सुपर डान्सर चेप्टर’ यासह अनेक नृत्य-आधारित कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.