प्रितम प्रकाश महाविद्यालयात कारगिल विजय स्मृती दिन साजरा

भोसरी – येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात गुरूवारी कारगिल विजय स्मृती दिन साजरा करण्यात आला. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थितांनी शहीद जवानांना मानवंदना दिली. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळे आपण सर्व सुरक्षित असून कारगिल युध्दामध्ये भारतीय जवानांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्‌याचा डाव उलथून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुधाकर बैसाणे यांनी कारगिल युध्दाची आठवण करुन देत सर्व विद्यार्थ्यांनी देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडत असताना धार्मिक, सांप्रदायिक तसेच जातीय आधारावर तेढ निर्माण करणाऱ्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवावे असे आवाहन केले. यावेळी पुणे ते पंढरपूर दरम्यान 5 जुलै ते 23 जुलै 2018 दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, निसर्ग वारी या राष्ट्रीय पातळीवर उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल रासेयो स्वयंसेवक मेघशाम सुडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय निकम यांनी केले. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. हनुमंत शिंदे, प्रा. सचिन पवार, प्रा. प्रविण म्हस्के, प्रा. सुधाकर बैसाणे, प्रा. डॉ. स्वाती वाघ, प्रा. विभा ब्राम्हणकर, प्रा. मिनाक्षी माकुडे, प्रा. प्रशांत रोकडे, प्रा. ऍड. महालक्ष्मी ठुबे, अनिकेत सांडभोर व आदेश ससाणे तसेच रासेयोचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)