प्राध्यापक संघटनांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार – विनोद तावडे

मुंबई: प्राध्यापक संघटनांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करत असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिली.

प्राध्यापकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आज सविस्तर चर्चा झाली. यामध्ये सातवा वेतन आयोग, पद भरतीचा विषय, ७१ दिवसाच्या प्राध्यापकांच्या संप काळातील वेतन, विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन आदी विषय होते. या सगळ्या विषयांमध्ये शासन कशा पद्धतीने सकारात्मक विचार करते आहे, याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. आजच्या बैठकीतील लिखित मिनिट्स दोन्ही संघटनांना दिले जातील. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका पाहता प्राध्यापकांचा बेमुदत संप मागे घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध प्राध्यापक संघटनांचे प्रतिनिधी आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. तावडे यांच्यासमवेत आज एक बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार बी. टी. देशमुखआमदार दत्तात्रय सावंतआमदार श्रीकांत देशपांडेअखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे डॉ. अनिल कुलकर्णीप्राध्यापक वैभव नरवडेप्रदीप खेडेकरएम फुक्टो शिक्षक संघटनेचे सरचिटणीस डॉ. लवांडेडॉ. मुखोपाध्यायडॉ. परांजपे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे प्रलंबित वेतनसातवा वेतन आयोगतासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ,प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची भरती प्रक्रिया चालू करणे आदी विविध मागण्यांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली. प्राध्यापक संघटनांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मकरित्या प्रयत्न करीत आहे. प्राध्यापकांच्या विविध मागण्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास श्री. तावडे यांनी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले विषय सविस्तरपणे मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)