प्राधिकरण अध्यक्षपदी खाडे ; पानसरेंना ठेंगा

पिंपरी – गेली अनेक वर्षे रखडलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाला अखेर मुहूर्त लागला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची या पदावर वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये डेरेदाखल झालेले ज्येष्ठ आझम पानसरे यांची पदावरील संधीही हुकल्याने भाजपने त्यांना ठेंगा दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापनेपासून आजपर्यंत 27 जणांनी अध्यक्षपद भुषविले आहे. त्यातही केवळ सातच वेळा राजकीय व्यक्तींना हे पद भुषविण्याची संधी मिळाली असून उर्वरीत 20 वेळा शासकीय अधिका-यांच्या हातातच प्राधिकरणाची दोरी राहिली आहे. 25 ऑक्टोंबर 2001 ते 22 ऑक्टोंबर 2004 या कालावधीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब तापकीर यांनी प्राधिकरणाचे शेवटचे अध्यक्ष म्हणून हे पद उपभोगले. त्यानंतर आजतागायत कोणत्याही राजकीय व्यक्तीला ही खुर्ची लाभलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेली कार्यकारणीच प्राधिकरणाचा कारभार हाकत होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा राजकीय अध्यक्ष प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार खाडे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. सदाशिव खाडे हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तथापि, या पदावर आझम पानसरे यांनाच संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यांच्या समर्थकांकडूनही तशी मागणी केली जात होती. मात्र, पानसरे यांना याठिकाणीही संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)