प्राधिकरणाची तीन मोबाईल टॉवरवर कारवाई

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या जागेत विनापरवाना मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याची तक्रार जागरुक नागरिक संघटनेने प्राधिकरणाकडे केली होती. त्याची दखल घेऊन प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने तीन मोबाईल टॉवरवर कारवाईचा बडगा उभारला असून टॉवर पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती, अतिक्रमण विभागाचे उप अभियंता वसंत नाईक यांनी दिली.

रहिवासी भागात मोबाईल टॉबर उभारण्यांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे कोणताही परवाना न घेता या कंपन्यांनी प्राधिकरणाच्या जागेत मोबाईल टॉवर उभारले आहेत. प्राधिकरणाच्या जागेत कोणतेही बांधकाम करण्याआधी परवानगी घेणे गरजेचे असते. परंतु, संबंधित मोबाईल कंपन्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीला नोटीसा देण्यात आल्या होत्या. यापैकी महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या पेठ क्रमांक 25 मधील सावरकर सदनजवळील टॉवर पाडण्याचे काम सुरू आहे. तसेच पेठ क्रमांक 27 (अ) च्या लोकमान्य रुग्णालयासमोर असलेले टॉवर आणि पेठ क्रमांक 28 मधील म्हाळसाकांत चौकात असलेला बडोदरा बॅंकेच्या वर असलेले टॉवर पाडणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. तीनही जागेतील मोबाईल कंपनीचे टॉवर जिओ कंपनीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात मोबाईल कंपन्याचे टॉवर दिवसें-दिवस वाढत आहे. ही चिंतेची बाब असून त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या टॉवरमधून निघणाऱ्या किरणांमुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कॅन्सर, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि मानसिक आजार उद्‌भवण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यामुळे, हे टॉवर रहिवासी इमारत, रुग्णालय आणि शाळा अशा ठिकाणांपासून दूर पाहिजेत. जागरूक नागरिक संघटनेच्या वतीने नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या घेऊन प्राधिकरण प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सदस्य डॉ. सुरेश बेरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)