प्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू

गोंदवलेसह माण तालुक्‍यात हळहळ

गोंदवले, दि. 23 (वार्ताहर) – गोंदवले, ता. माण येथील कु. प्राची सुनिल कुलकर्णी वय 26 यांचा दि. 22 रोजी नवी मुंबई येथे इमारतीच्या गच्चीवरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याने माण तालुक्‍यातुन हळहळ व्यक्त होत आहे. म्हसवड येथील माणदेशी महिला बॅंकेच्या महाव्यवस्थापिका रेखा कुलकर्णी यांच्या त्या कन्या होत.
कु. प्राची या शिक्षणानिमित्त नवी मुंबई येथील कामोठा परिसरात राहत होत्या. दि. 22 रोजी त्या इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन खाली पडल्या. माणदेशी महिला बॅंकेच्या अनेक सदस्यांनी ही खबर ऐकताच तडक नवी मुंबई गाठली. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला होता. या घटनेमुळे म्हसवड व गोंदवले येथे हळहळ व्यक्त करण्यात आली. येथील माणदेशी फाउंडेशनच्या सहकार्याने प्राची या ग्रामीण भागातील महिलांना अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करत होत्या. सर्वसामान्य महिला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या पाहिजेत हे त्यांचे धोरण होते.बेंगलोर येथील विप्रो युनिवर्सिटीची पदवी त्यांनी संपादित केली होती. उच्चविद्याविभूषित असल्याल्या प्राची यांचे एक ते दोन दिवसांत चेन्नई एका नामांकित कंपनीमध्ये निवड झालेली होती. त्या चेन्नईला जाणार होती. मात्र काळाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. प्राची यांचे आई-वडील व भाऊ हे देखील उच्चविद्याविभूषित आहेत. आज सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणात गोंदवले बुद्रुक येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.