प्राइस वॉरमुळे फक्त जिओला कोट्यवधीचा फायदा

मुंबई : प्राइस वॉरमुळे जिओ वगळता इतर दूरसंचार कंपन्यांची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. आर्थिक वर्ष २०१८ च्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्यूलरचे नुकसान तिपटीने वाढून ९३०.६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे. ऑपरेटिंग रेव्हेन्यू २४ टक्क्यांनी कमी होऊन ६,१३७.३ कोटी रूपये इतका झाला आहे.

आयडिया सेल्यूलरने आर्थिक पडझडीला गळेकापू स्पर्धा आणि कठोर नियमांना जबाबदार धरले आहे. आयडियाला आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४,१३९.९० कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये कंपनीच्या नुकसानीचा आकडा ४०४ कोटी रूपयांपर्यंत आला होता. दरम्यान, याच कालावधीत रिलायन्स जिओने ५१० कोटी रूपयांचा फायदा कमावला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये जिओच्या प्रवेशानंतर दूरसंचार क्षेत्रात प्राइस वॉर भडकले आणि याचा थेट आणि नकारात्मक परिणाम प्रतिस्पर्धी कंपनींच्या ताळेबंदावर पडत असल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)