प्रांताधिकारी कार्यालयासमोर “रिपब्लिकन’चे आंदोलन

बारामती- सामाजिक न्याय विभागा अंतर्गत असणाऱ्या सर्वच मागासवर्गीय महामंडळाकडील थकीत कर्जे तात्काळ माफ करावीत, सुशिक्षित बेरोजगार युवकांची रोजगारासाठीची कर्ज प्रकरणे अडवून ठेवणाऱ्या बॅंकांच्या शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, बारामती शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सुनील शिंदे, शहराध्यक्ष संजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पांढरपट्टे यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले. तालुकाध्यक्ष मधूकर मोरे, युवक जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनवणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयर्श्री जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष रत्नप्रभा साबळे, जिल्हा उपाध्यक्ष इंदुमती जगदाळे, दौंड महिला आघाडीच्या अध्यक्षा आशा मोहिते, बारामती शहराच्या पुनम घाडगे आदी शेकडो महिलांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. युवा अध्यक्ष मयूर मोरे, शहर संपर्क प्रमुख निलेश जाधव, उपाध्यक्ष गणेश शिंदे, रोहीत सोनवणे, अमोल कांबळे आदी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)