“प्रस्थानम’च्या सेटवरील जॅकीचा व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडमधील सुपरहिट अभिनेता जॅकी श्रॉफ सध्या 2010 मधील “प्रस्थानम’ या सुपरहिट तेलुगू या चित्रपटाच्या हिंदी रिमेकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचे शूटिंग लखनौमध्ये सुरू आहे. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय मनिषा कोइराला, अली फैजल, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे आदी कलाकारही झळकणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ जॅकीने ट्‌वीट केला असून तो सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत जॅकी श्रॉफ सहकलाकार सत्यजीत दुबे याच्यासोबत गाणे गाताना दिसून येतो. हे दोघे जण किशोर कुमारचे “सर जो तेरा चकराए’ हे गाणे म्हणत असून, हे गाणे प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी वॉकर यांच्यावर आधारित आहे. यात दोन्ही कलाकारांमध्ये चांगलाच सुर जुळला असल्याचे दिसून येते.

दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीलाच या चित्रपटाचे मोशन पोस्टरही प्रदर्शीत करण्यात आले होते. ज्यात चित्रपटातील मुख्य भूमिका साकारत असलेल्या संजय दत्तचा दमदार आवाज ऐकू येतो. या चित्रपटात मनिषा कोइराला संजय दत्तच्या पत्नीची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देव कट्‌टा हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)