प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले

पुणे:  येथील इंदापूरजवळील कार्व्हर एविएशन (पायलट ट्रेनिंग इंस्टीट्यूट) चे प्रशिक्षित विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. जखमी झालेल्या प्रशिक्षित पायलटला बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये ग्लेडर हे प्रशिक्षणासाठी वापरले, जाणारे विमान कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या विमानातील शिकाऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंदापूर तालुक्यात बाबीर रुई या गावामध्ये श्री बाबीर विद्यालयाजवळ विमान कोसळले. सकाळी १० वाजता अक्कलकोट येथुन विमान घेऊन बारामतीला निघाले होते दुपारी १२ वाजून ५ मिनीटांनी विमान बाबीर विद्यालयाच्या मागील बाजूस ३५०० हजार फुटांवरुन कोसळले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)