प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटीला “टार्गेट’

संग्रहित छायाचित्र

महसूल घटला : संप, आंदोलाचा फटका

पुणे – वेतनवाढीसाठी कामगारांनी केलेला संप आणि त्यानंतर आरक्षणासाठी झालेले आंदोलन यानंतर एसटी महामंडळाच्या पाठीमागे साडेसाती लागली आहे. या सततच्या घटनांनतर एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत महिन्याकाठी तब्बल पंधरा ते वीस लाखांनी घट झाली आहे; त्यामुळे दरमहा मिळणारा महसूलही दहा ते पंधरा लाखांनी कमी झाला आहे. त्याची महामंडळाने गंभीर दखल घेली आहे. त्यानुसार आगामी सणासुदीच्या काळात प्रवासी संख्या वाढविण्यासाठी सर्व विभागांना “टार्गेट’ ठरवून देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत खासगी बसगाड्या ही एसटी महामंडळाच्या दृष्टीने एक प्रकारे डोकेदुखी होउन बसली आहे. या खासगी बसेस एसटीच्या बसेसपेक्षा जास्त आरामदायी असल्याने आणि एसटीच्याच दरात त्या सेवा पुरवित असल्याने एसटीचा बहुतांशी प्रवासी या बसेसकडे वळले होते. त्यामुळे महामंडळाच्या महसूलात कमालीची घट झाली होती. त्याशिवाय स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी महामंडळ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

त्याची दखल घेऊन महामंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत वातानुकूलित आणि आरामदायी बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणल्या आहेत. महामंडळ आणि स्वत: रावते यांनी या बदलात स्वत: जातीने लक्ष घातल्याने गेल्या काही वर्षांत महसूलात अपेक्षेपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. मात्र, कामगारांनी ऐन दिवाळीच्या मूहूर्तावर संप पुकारल्याने सर्वसामान्य प्रवासी नाराज झाले होते. तेथूनच काही प्रमाणात प्रवाशांच्या संख्येला गळती लागली होती; त्यानंतर विविध आंदोलनांमुळे या प्रवासी संख्येत आणखी घट झाली आहे.

प्रवाशांना वळविण्याचे प्रयत्न
घटलेली प्रवासी संख्या पुन्हा वाढविण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये आम्हाला निश्‍चितपणे यश येईल, असा दावा एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)