प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर सफाई कामगारांचा मोर्चा

पिंपरी-कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि.26) पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले येथील पुतळ्यापासून दुपारी तीन वाजता महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत कष्टकरी कामगार पंचायत वतीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सफाई कामगार महासंघाचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे , कष्टकरी कामगार पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, शहराध्यक्ष संभाजी गोरे, अमर जयस्वाल, सविता लोंढे, माया कांबळे, रेणुका तोडकर, मंगल जाधव, अनिता सोनवणे, आशा पठारे, मंगल कसबे , कविता लोखंडे, सविता घाडगे, शरद पवार आदी उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे.त्यांना सामान आणि किमान वेतन मिळावा. प्रॉव्हिडंट फंड मिळावा. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सफाई कामगार महिलांना प्राधान्य देण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यातील साफ सफाई कामगारांचे पाय धुऊन त्यांचे पूजन केले. त्याचा आदर्श घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांचे प्रश्‍न सोडवावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.