प्रभू रामही सद्य स्थितीत पैशांशिवाय निवडणूक जिंकू शकले नसते – सुभाष वेलिंगकर

पणजी – सध्याच्या राजकीय परिस्थिती प्रभू श्रीरामांनाही पैशांशिवाय निवडणूक जिंकणे शक्‍य झाले नसते, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

गोवा सुरक्षा मंचच्या (जीएसएम) पणजी येथे आयोजित युवा संमेलनात ते बोलत होते. सुभाष वेलिंगकर म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थिती प्रभू श्रीरामांनाही निवडणूक जिंकण्यासाठी पैसे खर्च करावे लागले असते. राजकारणात दोन पद्धतीचे लोक असतात ते युवक आणि महिलांना रोख किंवा भेटवस्तूंचे अमिष देण्यात व्यस्त असतात. हे लोक त्यांना साधे, सरळ वाटतात. सद्य परिस्थितीत निवडणुकांदरम्यान होणाऱ्या पैशांच्या अवास्तव वापर पाहता प्रभू रामचंद्रांनाही इतके पैसे खर्च केल्याशिवाय निवडून येता आले नसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी वेलिंगकर यांनी मनोहर पर्रिकर आणि भाजपावर टीका केली. दोन मंत्री आजारी असल्याचे कारण सांगत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. परंतु, पर्रिकर स्वत: गंभीर आजारी असतानाही आपल्या पदावर कायम आहेत. भाजपाने नैतिकता गमावली असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण सहन केले जाणार नसल्याचे भाजपाकडून सांगितले जाते. परंतु, पैसे न घेणारा त्यांचा एकही मंत्री नसल्याचा गंभीर आरोपही वेलींगकरांनी केला.

दरम्यान, वेलिंगकर यांनी 2017 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला वेगळा पक्ष स्थापन केला आहे. शालेय शिक्षणात भाषेच्या माध्यमावरुन त्यांच्यात आणि मनोहर पर्रिकर यांच्यात मतभेद झाल्यानंतर त्यांनी जीएसएमची स्थापना केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)