प्रभास लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या अनेक दिवसांपासून “साहो’ चित्रपटातून अमरेंद्र बाहुबली म्हणजेच प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. श्रद्धा कपूर आणि प्रभासची जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे वृत्त जात आहे.

150 कोटी बजेट असलेला हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची शक्‍यता साहोच्या टीमने व्यक्त केली आहे. निर्मातेही या दिशेने प्रयत्न करत असून हा चित्रपट 2019च्या एप्रिल महिन्यापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या व्यतिरिक्त चित्रपटात नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर सुद्धा झळकणार आहेत. अनेक भयानक स्टंट चित्रपटात करताना प्रभास दिसणार आहे. जगातली सर्वात उंच इमारत दुबईची “बुर्ज खलिफा’वर याचे चित्रिकरण केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)