प्रभात डेअरी अपहार प्रकरणीतील गायके यांचा अटकपूर्व फेटाळला

श्रीरामपूर – प्रभात डेअरी मधील खरेदी विभागात झालेल्या अपहार प्रकरणातील बापूसाहेब गायके यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. यातील दुसरा आरोपी आनंद वाघ यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
प्रभातच्या खरेदी विभागात कार्यरत असलेले कर्मचारी बापुसाहेब विनायक गायके (रा. गेवराई, जि. बीड) व आनंद पांडुरंग वाघ (रा. रांजणखोल ता. राहाता) यांनी सन 2013-2014 पासुन जुलै 2018 पर्यंत 20 लाखाचा अपहार केल्याचे अंतर्गत लेखापरिक्षणातून उघडकीस आले. खरेदी विभागाचे या कालावधीमधील लेखापरिक्षण केले असता गायके व वाघ यांच्याविरुद्धचे पुरावे सापडले. या पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गायके यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आरोपी विरूद्धच्या पुराव्यांची पडताळणी न्यायालयाने गायके यांचा जामीन अर्ज नामंजुर केला. गायके हे सध्या फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.
या अपहारात प्रभात डेअरीतील या विभागातील यापूर्वी कार्यरत असलेले इतर अधिकारी व कर्मचारी तसेच प्रभात डेअरीला माल पुरविणारे अनेक पुरवठादार देखील सहभागी असल्याचा संशय आहे.सहायक पोलिस निरिक्षक श्रीराम शिंदे अधिक तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)