प्रत्येक अडचणीत खंबीरपणे पाठीशी- पवार

श्रीगोंदा – बापूंनी तालुक्‍यात सहकारी आणि शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले. बापूंनी समाजसेवेचे केलेले कार्य त्यांच्या विचारावर पुढे नेणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना व्यक्‍त करीत प्रत्येक अडचणीत खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहू, असा आधार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागवडे कुटुंबियांना दिला.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर शनिवारी सकाळी वांगदरी येथील निवासस्थानी अजित पवार यांनी राजेंद्र नागवडे, दीपक नागवडे व कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पवार यांनी तब्बल एक तासभर चर्चा करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, सन 1998 साली मी राज्य सहकारी बॅंकेचा अध्यक्ष होतो, आणि जयंत पाटील हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. साखर कारखानदारीतील समस्या जाणून घेण्यासाठी राज्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बापूंच्या कारखान्यातील बारीक-सारीक गोष्टींच्या असलेल्या सखोल अभ्यासाची प्रचिती आली.
पवार म्हणाले, हयातभर साखर कारखान्यात काम केलेल्या अभियंत्यापेक्षा देखील बापूंचा अभ्यास अधिक होता. बापूंनी हयातभर सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. प्रत्येक गोष्टीसाठी बापूंना संघर्ष करावा लागला. वयाच्या 85 व्या वर्षी देखील त्यांच्याकडे कामाची आणि संघर्ष करण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. त्यांचा घेऊन तरुनपिढीने वाटचाल करणे गरजेचे आहे. बापूंच्या निधनाने सहकारातील अभ्यासू व संघर्षशील नेतृत्व हरपल्याची भावना पवार यांनी यावेळी व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)