प्रतिभावान खेळाडूंच्या स्थैर्यासाठी पाठबळाची गरज!

पिंपरी – खेळाडूंना सुरुवातीच्या कारकिर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्‍यकता असते. गुणवान खेळाडूला प्रोत्साहन आणि प्रेरणा दिल्यास त्याला बळ मिळू शकते. त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळण्यासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे, असे आवाहन रुस्तम-ए-हिंद व महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांनी व्यक्त केले.

थेरगाव येथे प्रेरणा को.ऑप बॅंकेच्या 20 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रेरणा मिनी मॅरेथॉन, पारितोषिक वितरण, मोबाईल बॅंकिंग सुविधा व आरोग्य शिबीर आदी कार्यक्रम आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे संस्थापक तुकाराम गुजर होते. नगरसेवक नाना काटे आणि झामाबाई बारणे यांच्या हस्ते प्रेरणा मिनी मॅरेथॉनचे व बी. टी. लावंड यांच्या हस्ते मोबाईल बॅंकिंग सुविधेचे उद्‌घाटन करण्यात आले. परिसरातील शाळांमधील एक हजार विद्यार्थ्यांनी प्रेरणा मिनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रसंगी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, निलेश बारणे, संदीप गाडे, बॅंकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, उपाध्यक्ष संतोष मुंगसे, ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, अंकुश पऱ्हाड, पालक संचालक सुरेश पारखी, लक्ष्मण काटे, राजाराम रंदिल, संजय पठारे, संदीप पवार, राजेंद्र शिरसाठ, उमेश आगम, नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रभागा भिसे, सुजाता पारखी, मीना शेळके, शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी विलास दसाडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बेहरे आदी उपस्थित होते.

मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमधून प्रियांका गुप्ता, अस्मिता लोहार, पूजा शेरे, साक्षी बंडगर, सुनीता तनोजिया यांनी तर मुलांमधून रमेश पाटील, अल्लाउद्दीन अन्सारी, संकेत कुमावत, साहिल ढाये, प्रथमेश पाटील यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकाविले. यावेळी घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)