प्रतिक्षा घुले यांची शिवसेना पिंपरी विधानसभा संघटिका पदी निवड

दिघी – शिवसेने शहरात विविध पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. पक्षाने यंदा तरुणाईवर पक्षवाढीची जबाबदारी सोपवली आहे. याच निवड प्रक्रियेत बोपखेल येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्या प्रतिक्षा लक्ष्मण घुले यांच्यावर पिंपरी विधानसभा संघटिका पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्षा घुले यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलताना सांगितले की, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, शहरप्रमुख योगेश बाबर यांच्या शिफारसीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ही नियुक्‍ती करण्यात आली आहे. पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिघी-बोपखेल प्रभागात सेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच स्थानिक पातळीवरील नागरिकांचे प्रश्‍नही पक्ष संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. तसेच पिंपरी विधानसभा क्षेत्रातील महिलांच्या समस्यावरही आवाज उठवू. दरम्यान प्रतिक्षा घुले यांच्या नियुक्‍तीबद्दल दिघी-बोपखेल परिसरातील सामाजिक संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. दक्षता समिती सदस्य रविंद्र गोपाळ कोवे, उद्योजक कमलेश घुले, उद्योजक काळूराम घुले, संदीप गायकवाड, नामदेव गोगावले आणि संदीप घुले यांनी पुढाकार घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)