प्रज्ञाशोध परीक्षेत कोळेगाव शाळेचे घवघवीत यश

अकलूज- अक्षरगंगा प्रकाशनच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेगांव (ता. माळशिरस) या शाळेने घवघवीत यश मिळविले आहे. या शाळेतील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अनुश्री तानाजी गेजगे हिने 150 पैकी 128 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक मिळविला.अनुश्री गेजगे हिला वर्गशिक्षिका पल्लवी मेणकर-महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते, केंद्रप्रमुख शैलजा जाधव यांनी अनुश्री गेजगे आणि मार्गदर्शक शिक्षिका पल्लवी मेणकर-महाजन यांचे अभिनंदन केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि कोळेगांव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच प्रमिला दुपडे यांच्या हस्ते अनुश्री गेजगे आणि पल्लवी मेणकर-महाजन यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब सावंत, संतोष सावंत, मुख्याध्यापक दऱ्याबा येडगे, रुक्‍मिणी पारसे, प्रिया तोरणे, प्रियांका पारसे, मनिषा सावंत, सुवर्णा सावंत, ज्योती सावंत, ऊर्मिला सावंत, वनिता चव्हाण, शिवाजी गेजगे, पत्रकार शाहरूख मुलाणी यांचेसह पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)