प्रकल्प देण्याचे आमिषाने महिलेची 30 लाखाची फसवणूक करणारा जेरबंद

पुणे- सौरऊर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिषाने पुण्यातील महिलेची 30 लाख 75 हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. आरोपीने याप्रकारे जालना, अमरावती तसेच हैद्राबाद येथील नागरिकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
राहुल करम सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात श्‍वेता नेमळेकर (रा. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या उच्चशिक्षित आहेत. तसेच त्या नोकरीच्या शोधात होत्या. आरोपी राहुल सिंग आणि फिर्यादी महिलेची 2016 मध्ये भेट झाली होती. आरोपीने हैद्राबाद येथे माझी कंपनी असून आयबीएम आणि एसटीपीआय भारत सरकार यांच्याबरोबर भागिदारी असल्याची माहिती दिली. फिर्यादींना सौरऊर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखविले तसेच फिर्यादींना परदेशात दोन कंपन्या रजिस्टर करायला लावल्या. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या भागिदारांना त्याच्या कंपनीच्या बॅंक खात्यात रक्‍कम जमा करायला लावली. त्यातून 30 लाख 75 हजारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी नोव्हेंबर 2017 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस कर्मचारी विनोद साळुंके यांना आरोपीविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क पोलिसांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेतले. आरोपी हा सतत ठिकाणे बदलून राहत होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा होते. मात्र, पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)