पौडच्या युनियन बॅंकेत खातेदारांना मनस्ताप

  • सेवा सुधारण्याच्या मागणीचे व्यापारी संघ पौडच्या वतीने बॅंकेला निवेदन
  • अन्यथा “भजन करो आंदोलन’ करणार

पिरंगुट – मुळशी तालुक्‍याचे प्रशासकीय ठिकाण असलेल्या पौड येथे युनियन बॅंक ऑफ इंडिया या केवळ एकाच राष्ट्रीयकृत बॅंकेची एकमेव शाखा असल्याने येथील बॅंक व्यवहार करणाऱ्या नागरिकांना तासंनतास ताटकळत बसावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. युनियन बॅंकेने आपली सेवा सुधरावी. तसेच कर्मचारी संख्याही वाढवावी, म्हणून व्यापारी संघ पौडच्या वतीने युनियन बॅंकेला निवेदन देण्यात आले आहे.
पौड हे मुळशी तालुक्‍याचे प्रशासकीय केंद्र असल्याने या ठिकाणी सर्व प्रशासकीय कार्यालये आहेत. येथील ग्राहकांना तासनतास आर्थिक व्यवहारासाठी ताटकळत उभे राहावे लागते. संबधित बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही खूप दिवसांपासून असलेली समस्या सुटलेली नाही, अशी तक्रार ग्राहक करीत आहेत. युनियन बॅंकेची सेवा तात्काळ सुधारली नाहीतर पौडगाव व्यापारी संघाच्या वतीने बॅंकेसमोर “भजन करो आंदोलन’ करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पौडगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कार्ले, उपाध्यक्ष दीपक सोनवणे, सचिव श्रीकांत केणी, खजिनदार दत्तात्रय लांडगे, संस्थापक अध्यक्ष विशाल राऊत आदी उपस्थित होते.

  • एटीएम सेंटरचीही दुरावस्था
    दिवसभरातील काही तासांच्या कालावधीत 500 ते 600 ग्राहकांना बॅंकेचे केवळ 4 ते 5 लोक कशी काय सेवा पुरविणार? ते त्यांच्या परीने होईल तेवढे सहकार्य करतात. पण मनुष्यबळ कमी असल्यामुळे सामान्य ग्राहकांना खूप अडचणी सहन कराव्या लागतात. येथील एटीएम सेंटरमध्ये पैशाचा नेहमीच खडखडाट असतो. कधी मशीन चालू तर कधी बंद, एटीएम सेंटरचे छत कधी पडेल सांगता येत नाही. एटीएम सेंटरमध्ये जाळ्या झालेल्या आहेत. स्वच्छता तर काहीच नाही, ग्राहक सेवा केंद्रला फोन केला तर तांत्रिक अडचण सांगून फोन बंद केला जातो.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)