पोहताना कोणते कपडे घालावेत – मलायका अरोरा

मलायका अरोराने अलिकडेच इन्स्टाग्रामवर आपले बिकनीतले काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी चांगलीच टीका केली. ट्रोल करताना अनेकांनी अगदी असभ्य शेरेबाजीही केली. मात्र मलायकाने या शेरेबाजीवर विनाकारण स्पष्टिकरण देण्याचा त्रास करून घेतला नाही.

दुसऱ्याच्या भानगडीत लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचनाही तिने या ट्रोलबहाद्दरांना केली आहे. स्विमिंग सूटमधील ज्या फोटोवरून हा गोंधळ झाला, ते मालदिवमध्ये असतानाचे सुमारे वर्षभरापूर्वीचे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलायका काय करते आहे, कोणते फोटो शेअर करते आहे, एवढेच कदाचित लोकांना बघायचे असेल, अशा शब्दात तिने ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला. याशिवाय “पोहताना कोणते कपडे घालायला पाहिजे.’ असा प्रश्‍नही तिने ट्रोलकऱ्यांना विचारला आहे. तिच्या या प्रश्‍नानंतर मात्र कोणीही तिच्या फोटोंवर कॉमेंट केली नाही, असे समजते आहे. पण मलायकाच्या या फोटोंमधील हॉट अंदाज मात्र नेटवर जबरदस्त व्हायरल झाला आहे. तिच्या या लुकचा आनंद घेण्याऐवजी नेटकऱ्यांनी तिला विनाकारण ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरच मलायका भडकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)