पोस्टल पेमेंट बॅंक आजपासून सेवेत

पुणे – टपाल विभागाची पुणे शहरातील पहिली “इंडिया पोस्टल पेमेंट बॅंक’ ही येत्या एक सप्टेंबरपासून सिटी पोस्ट येथील कार्यालयात सुरू होत आहे. यानुसार पोस्टमन घरी येऊन पैसे देणार तसेच खात्यामध्ये पैसे भरणार आहे. यामुळे घरबसल्या बॅंकिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

पोस्ट मास्तर जनरल कर्नल रिझवी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बॅंकेत बचत खाते, चालू खाते उघडणे, पैसे पाठवणे, हस्तांतर करणे, बिल भरणे आदी सेवा पुरविल्या जाणार आहेत. घरपोच बॅंकिंग, मायक्रो एटीएम, मोबाईल बॅंकिंग अॅप आदी डिजिटलच्या माध्यमातून या सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच या बॅंकेचे खाते घरबसल्याही उघडता येणार आहे. या बॅंकेत कोणालाही खाते काढता येणार आहे. तसेच बॅंकेत न जाताही घरबसल्या पैसे काढता येणार आहे. त्यासाठी बॅंकेकडून खातेदारांना “क्‍यू आर कार्ड’ देणात आहे. हे कार्ड आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल पद्धतीचा वापर करून देशभरात कुठेही पैसे काढता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या टप्प्यात देशभरातील टपाल खात्याच्या 650 शाखांमध्ये ही बॅंक सुरू होणार आहे. त्यामध्ये सिटी पोस्टासह पुणे विभागात सहा ठिकाणी ही बॅंक सुरू करण्यात येणार आहे. एक सप्टेंबर रोजी दुपारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या बॅंकेचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक आणि खासदार अनिल शिरोळे उपस्थित राहणार आहेत. टप्याटप्प्याने सर्व शाखांमध्ये ही बॅंकेची सुविधा पुरविली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)