पोल्ट्री व्यवसायाला पोहोचताहेत उन्हाच्या झळा

करंजे- सोमेश्वर, भापकर मळा, मुर्टी, होळ, माळशी, मोरगाव, वाकी, चोपदाज, पळशी या सर्व गावांमधील पोल्ट्री व्यवसायाला उन्हाच्या झळा पोहचत असून, तीव्र उन्हामुळे येथील पक्षी मरण्याचे प्रमाण वाढले आहे, असे येथील पोल्ट्री व्यावसायिक पोपट येळे यांनी सांगितले.
मार्चमध्ये सुरू झालेल्या तीव्र उन्हाळ्याने आता एप्रिल महिन्यात चाळिशी गाठली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन व्यावसाय चालतो. प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या पद्धतीने या व्यवसायासमोर समस्या येत असतात आणि हा व्यवसाय वाचवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. मात्र, सध्या तपमानाचा पारा 40 डीग्री सेल्सिअसच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे या तीव्र उन्हापासून पोल्ट्री मालकानना शेडमधील बॉयलर जातीच्या कोंबड्या जगवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत. या कोंबड्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मरण्याचे प्रमाण वाढले आहे.
पक्ष्यांना वाचवण्यासाठी शेडच्या वर असलेल्या सिमेंटच्या पत्र्याला चुना मारणे, त्यावर उसाचे पाचट किंवा नारळाच्या झावळ्या टाकणे, स्प्रिकलरने पाणी मारून परिसर थंड ठेवणे असे प्रयत्न सध्या पोल्ट्री मालक करीत आहेत. याबरोबर पक्ष्यांना लागणाऱ्या पाण्याच्या टाकीला देखील ओली पोती गुंडाळून पाणी थंड ठेवले जात असून, खाद्यपदार्थ देखील सकाळच्या थंड किंवा सायंकाळच्या उन्हे उतरण्याच्या वेळेला दिले जात आहेत. याचवेळी पाण्यातून आणि खाद्यातून त्यांना पूरक आणि पोषक औषधेही दिली जात असल्याचे पोल्ट्री मालकांनी सांगितले. भर उन्हात दुपारी खाद्यपदार्थ दिल्यास ते त्यांना त्रासदायक ठरत असून, पक्षी मरण्याची संख्या वाढण्याची शक्‍यता असते, त्यासाठी ही काळजी घेतली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)