पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेत बदल

पुणे,दि.20- पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेत बदल करण्यात आला आहे. या बदलानूसार प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उभेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्‍यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरीक चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे.भरती प्रक्रीया दिघेकाळ सुरु न रहाता जलद गतीने पार पडले. त्यामुळे जिल्हयाबाहेरील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्‍चीत होईल अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील यांनी दिली.
पोलीस भरतीच्या प्रक्रियेत शारीरीक चाचणी दरम्यान होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन हा बदल घेण्यात आला आहे. शारीरीक चाचणीत धावताना अनेक जण चक्कर येऊन पडतात तर काहीचा यामध्ये मृत्यूही झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.