पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई – राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवेमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (दि.31) पडसलगीकर हे निवृत्त होणार होते. मात्र, तत्पूर्वी मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी पडसलगीकर यांच्या मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला.

जनहितार्थ महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना 31 ऑगस्ट 2018 रोजीच्या निवृत्ती तारखेनंतर पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे कार्मिक मंत्रालयाने म्हटले आहे. पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे 1982च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधीत डाव्या विचारसरणींच्या विचारवंतांवर देशभरात महाराष्ट्र पोलिसांकडून सध्या छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. यापैकी चार जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पडसलगीकर यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)