पोलीस पत्नी संघाचे उद्यापासून उपोषण

पुणे-पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना होणारा अन्याय, पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या निलंबनासह, बेकायदा शिस्तपालन पथक बंद तसेच विविध मागण्यांसाठी पोलीस पत्नी संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे आंदोलन सुरू करण्यात आले होते; परंतु आंदोलनातील मागण्यांची पूर्तता न झाल्याने आता पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस पत्नी संघ महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा यशश्री प्रमोद पाटील यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे पोलीस पत्नी संघ महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा यशश्री प्रमोद पाटील यांनी दहा एप्रिलपासून आंदोलन सुरु केले होते. यावेळी आंदोलनामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा, पोलिसांना हक्काचे घर द्या, शहीद तसेच ड्युटीवर मृत पावलेल्या पोलिसांच्या पत्नींचे घरभाडे माफ करा, एका पोलीस पाल्यास भरती करून घ्या, पोलिसांवरील वाढते हल्ले थांबविण्यासाठी पोलिसांना अधिकार द्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास व छळ थांबवावा, पोलिसांना आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास देणारे आणि कोरेगाव भीमा दंगलीला जबाबदार असणारे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांना निलंबित करावे यांसह आदी मागण्या करत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या वतीने बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आलेले डिसीप्लिन स्कॉड बंद करून त्या ठिकाणी पोलिसांचे होणारे शोसन थांबवावे यांसह आदी मागण्या यावेळी करण्यात आलेल्या होत्या. आंदोलन सुरु होऊनही वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नसल्याने 14 एप्रिलपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरु करण्यात येणार होते; परंतु त्यांनतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य करणार असल्याचे पत्र त्यांना दिले. मात्र मागण्या मान्य करण्याचे पत्र देऊनही काहीही कार्यवाही केली नाही तर फक्त शिस्तपालन पथकामध्ये सामील करून घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ज्या कर्मचाऱ्यांनी राजकीय ताकद वापरली त्यांना पुन्हा रुजू करून घेतले. तसेच कोरेगाव भिमा दंगलीला जबाबदार असणारे शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांना निलंबित न करता फक्त पुणे मुख्यालयात रुजू करून घेतले. आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नसल्यामुळे तसेच नव्याने 2018 मध्ये झालेल्या पोलीस भरती घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच पोलीस अधीक्षक यांची चाललेली मनमानी थांबवावी या मागण्यांसाठी आता पुन्हा महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे एक मे पासून उपोषण करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)