पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांची बदली

सातारा,
सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांची पुणे ग्रामीणला बदली झाली आहे. लवकरच ते पुणे ग्रामीणला हजर होणार आहेत.

सारंगकर यांची पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्याहून साताऱ्याला बदली झाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच सारंगकर यांनी महत्त्वपूर्ण केसेसमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील खासगी सावकारांसह गुंडांचे कंबरडे मोडण्याचे यशस्वी काम त्यांच्या काळात झाले. सारंगकर यांच्या बदलीला पोलिस दलातील वरिष्ठ सुत्रांनी दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)