पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांची बदली

  • प्रकाश धस सूत्रे स्वीकारण्याची शक्‍यता

देहुरोड (वार्ताहर) – देहूरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांची मुख्यालय नियंत्रण कक्षामध्ये बदली झाल्याची, तर त्यांच्या पदावर प्रकाश धस रूजू होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

देहुरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचे कारभार अरुण मोरे यांनी 16 ऑगस्ट 2016 रोजी स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच पोलीस अधीक्षकपदी महम्मद सुवेझ हक यांची नियुक्‍ती झाली. त्यांनी पदभार स्वीकारत पुणे ग्रामीण हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालत गुन्हेगारांवर अंकुश घालत कायद्याचा निर्माण केला.

अवैध धंद्यांचा मायाजाल म्हणून नावाजलेले देहुरोड परिसरात अवैध धंदे, गुन्हेगारांसह अल्पवयीनांच्या निर्माण झालेल्या टोळ्या, खून, खुनाचे प्रयत्न, दहशत, तोडफोडीच्या घटना, मारामाऱ्या, घरफोड्या, चोऱ्या, दागिने हिसकावणे आदी विविध घडलेले गुन्हे 20 महिन्यांचा कारभारात पोलीस निरीक्षक मोरे यांनी त्यांच्या हातोटीने सांभाळण्याचा प्रयत्न केला. शनिवारी त्यांची बदली मुख्यालय नियंत्रण कक्षात झाल्याची माहिती मिळाली. कराडनंतर मंचर पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणारे पोलिस निरीक्षक धस सोमवारी (दि. 30) देहूरोड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार आहेत.

प्रकाश धस यांच्या येण्याची माहिती परीसरातील अवैध धंद्याच्या चालकांना मिळताच त्यांचा स्वभाव, इतिहास, गुन्हेगारांवरील वचक, कारभार हाताळण्याची हातोटी कशी असेल त्याची उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)