पोलीस उपनिरीक्षकाचा हॉटेलात धिंगाणा

पाथर्डी – शेवगाव येथील रहिवाशी असलेल्या व गेवराई (जिल्हा बीड) पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पाथर्डी येथील एका हॉटेलमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. पिस्तुलाचा धाक दाखवून हॉटेलमधल्या ग्राहकांना मारहाण केली. समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पाथर्डी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाच्या श्रीमुखात भडकावली. याबाबत पोलीस उपनिरीक्षकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेवगाव येथील रहिवासी असलेला व गेवराई (जि. बीड) येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेला अमोल तानाजी मालुसरे आपल्या इतर तीन मित्रांसमवेत पाथर्डीरोडलगत असणाऱ्या हॉटेल मधुबनमध्ये कारमधून दुपारी बाराच्या सुमारास आला. मित्रांसमवेत त्याने मद्य प्राशन केल्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपसात वादावादी करत हॉटेलमधील ग्राहकांना मारहाण केली. हॉटेल चालकांनी समजावून सांगत बिल मागितले असता मालुसरे समवेत असलेला दुसरा मित्र सागर तिजोरे मालुसरेचा पिस्तुल टेबलावर आपटून दहशत निर्माण करत होता. मालुसरे मी पोलिसवाला आहे, असे म्हणत पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पुन्हा काही ग्राहकांना मारहाण केली. ग्राहक व मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षक यांच्यात फिल्मी स्टाईल हाणामारी झाली.

यामध्ये ग्राहकांनी मद्यधुंद उपनिरीक्षक महाशयांना चांगला चोप दिला.हॉटेलचालकांनी घडलेला प्रकार पोलिसांना फोन करून कळविला. घटनेची माहिती समजताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पेठकर काही पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाहतात यातील दोघे जण पळून गेले. मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षक मालुसरे याला पाथर्डी पोलीस उपनिरीक्षक शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मालुसरे याने पोलीस उपनिरिक्षक पेठकर यांच्या श्रीमुखात भडकावली. मद्य पिऊन बेभान झालेल्या पोलीस उपनिरीक्षक मालुसरे व त्याचा मित्र तिजोरी याला अटक करण्यासाठी पोलिसांनी जादा कुमक मागविली. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

याबाबत हॉटेलचालक मल्हारी म्हातारदेव शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अमोल तानाजी मालुसरे, रा. शेवगाव, सागर बन्सी तिजोरी रा. खुंटेफळ, ता. शेवगाव व इतर दोघांविरोधात भादवि कलम 353 ,332, 323, 504, 506 आर्म एक्‍ट प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर करत आहेत.

पोलीस ठाण्यातही मालुसरेच्या लाखोल्या..
घटनेची माहिती पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यात वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांच्या गर्दीमुळे पोलीस ठाण्याला जत्रेचे स्वरूप आले होते. पोलीस ठाण्यात आणलेला मालुसरे जोरजोरात ओरडून पोलिसांना लाखोली वाहत होता. शासकीय रुग्णालयातही आरोग्य तपासणी करून घेण्यास त्याने गोंधळ घालून मनाई केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करतानाही पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)