पोलीस आयुक्‍तांपेक्षा अधिकारी “बिझी’

हिंजवडी पोलीस कर्मदरिद्री : आर. के. पद्मनाभन्‌ यांची नाराजी

पिंपरी – हिंजवडी पोलिसांनी एका संवेदनशील प्रकरणात केलेला हलगर्जीपणा त्यांच्या चांगलाच अंगलट आला असून पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन्‌ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. फिर्यादीला चार-चार तास बसवून त्यांना मानसिक त्रास देणारे पोलीस कर्मचारी हे पोलीस आयुक्‍तांपेक्षा जास्त “बिझी’ झाले आहेत का? असा सवाल स्वतः पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी उपस्थित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस आयुक्‍त पद्मनाभन्‌ यांनी मंगळवारी ऑटो क्‍लस्टर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले हातो. यावेळी पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल विचारले असता पद्मनाभन्‌ यांनी पोलिसांचा हलगर्जीपणा मान्य करत संबंधीत अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

हिंजवडी येथे मुलींच्या वसतीगृहात पहाटे तीनच्या सुमारास एका अज्ञात मुलाने हॉस्टेलमध्ये प्रवेश करून मुलीचा विनयभंग केला. ही तक्रार दाखल करण्यास गेलेल्या फिर्यादीलाच पोलिसांनी चार तास बसवून ठेवले. संबंधीत मुली व वसतीगृहाचीच उलट तपासणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज्‌ची पाहणी केल्यानंतर संशयीत आरोपी परिसरात आल्याची खबर देखील स्थानिकांनी पोलिसांना सांगितली. यावेळी पोलिसांनी माहिती देणाऱ्या स्थानिकाला पाठलाग करण्यास सांगितले, मात्र आरोपी फरार झाला. या प्रकरणात मानसीक त्रासानंतर पिडितेने व वसतीगृहाने पोलीस आयुक्‍तालय गाठले. यावेळीही पोलिसांनी आयुक्‍त असे भेटणार नाहीत, अशी मनमानी केली. या साऱ्या घटनेचा धक्का आयुक्‍तांनाच बसला. त्यानी संबंधीत पिडितेशी बोलणे केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्‍तांनी संबंधीत अधिकाऱ्यांचीच चौकशी बसवली. यावेळी आयुक्‍त आर. के. पद्मनाभन्‌ म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांची ही मानमानी पोलीस खात्यासाठी देखील घातक आहे. प्रकरणाची कसून चौकशी करून अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पद्मनाभन यांनी सांगितले.

“डे-ऑफिसर’ पदच नाही राहणार
यावेळी पद्मनाभन्‌ यांनी पोलीस खात्यातील आळस व ठराविक कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा मोडीत काढण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आता पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयातील पोलीस ठाण्यात डे-ऑफीसर हे पद राहणार नाही. सर्व कर्मचारी हे क्वीक ऍक्‍शन फोर्स सारखे काम करतील. यावेळी कोणीही कामचुकारपणा करणार नाही. तसेच वरिष्ठपणाचा फायदा घेत कामचुकारपणा, कोणा एकावरच 12 ते 16 तासाचे काम लादणे, हे खपवून घेतले जाणार नाही. यावेळी पोलीस ठाण्यात जे अती महत्त्वाचे किंवा मानाचे हेड कॉन्स्टेबल असतात, त्यांनाही नियम लावले जातील, असेही आयुक्‍त यावेळी म्हणाले.

हिंजवडी पोलिसांविरोधात तक्रारी
हिंजवडी पोलीस ठाण्यात झालेले विनयभंग प्रकरणातील हलगर्जीपणा या प्रमाणेचे हिंजवडी हद्दीतील जांबे प्रकरणातही पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. तसेच कासारसाई बलात्कार प्रकरणात देखील पोलिसांनी सुरुवातीला प्रकरण दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची मनमानी व त्याचा नागरिकांना होणारा मानसीक त्रास स्वतः आयुक्‍तांनीच उघड केला आहे.

मी कोणाला भेटावे, हे मी ठरवणार
मी आयुक्‍त जरी असलो, तरी नागरिकांची सेवा करण्यासोठी मला येथे नेमले आहे. माझ्याकडे नागरिकांना भेटायला वेळ आहे. मात्र मध्यस्थी करणारे पोलीस कर्मचारी त्यांना अडवत आहेत. जे योग्य नाही. त्यामुळे मी कोणाला भेटावे, हे मी ठरवणार, अशा शब्दात आयुक्‍तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना ठणकावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)