पोलिस पाटील संघटनेच्यावतीने निवेदन

गोंदवले, दि. 31 (प्रतिनिधी) – माण तालुक्‍यातील पोलिस पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये गावगाडा चालविण्यासाठी ऑफिस देण्यात यावी अशी मागणी माण तालुका पोलिसपाटील संघटनेच्या वतीने माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या लेखी निवेदनाव्दारे करण्यात आली. याबाबत तातडीने ऑफिस देण्याबाबत संबंधीताना आदेश देणार असल्याचे आश्वासन बीडीओ शेलार यांनी दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली.
माण तालुक्‍यात मार्च महिण्यात 105गावांपैकी बहुतांश सर्व गावात पोलिस पाटील यांच्या नियुक्‍त्या प्रांताधिकारी यांनी केल्या आहेत.या मध्ये महिला पोलिस पाटील यांची संख्या मोठी आहे.
पाच महिण्याच्या कालावधीत पोलिस पाटील आपआपल्या गावात महसूल विभाग व पोलिस खाते यांच्या आदेशानव्ये गावात प्रमूख या अधिकारात काम करत असून दुर्जन व संशयीत व्यक्तीवर नजर ठेवणे सराईत व हिष्ट्रीसिटर अपराध्यावर व भटक्‍यावर देखरेख ठेवणे व गावातील नागरिकांना वर्तुणूकीचे दाखले देणे व महत्वाचे गावात कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी काम करावे लागत आहे.
गावात पोलिस पाटील म्हणून कार्यरत असताना स्वतंत्र ऑफिस नसल्याने कुंचबना होत आहे.सन 2012मध्ये शासननिर्णय झाला असून नविन ग्रामपंचायत कार्यालयात पोलिस पाटील यांना स्वतंत्र ऑफिस देण्याबाबत स्पष्ट आदेश आहेत. मात्र आजअखेर त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
या बाबत माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेलार यांना माण तालुका पोलिसपाटील संघटणेचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले असून या वेळी संघटणेचे माण-खटावचे कार्याअध्यक्ष महेश शिंदे उपाध्यक्षा सौ. हर्षदा शिर्के सौ.काटकर पोलिसपाटील भाऊसाहेब चव्हण सुभाष काळेल रामचंद्र घुटुकडे दादा आटपाडकर सयाजी लोखंडे सौ.मोनाली बनसोडे महादेव साठे सुरेश चंदनशिवे सचिन अवघडे आदि पोलिस पाटील उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी शेलार म्हणाले पोलिस पाटील हा प्रशासन व गाव याच्या मधील दुवा असतो.अन्यायाला वाचा फोडून गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करावे लवकरच पोलिस पाटील यांना गावात ऑफिस देण्यासाठी संबंधीत ग्रामसेवक यांना आदेश देणार असल्याचे आश्वासन शेलार यांनी दिले असून माण पंचायत समातीचे सभापती रमेश पाटोळे यांनी ऑफिस सोय करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)