पोलिस दलामध्ये तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा समन्वय व्हावा

युवा पोलीस अधिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेचे उद्‌घाटन

नवी दिल्ली – तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनांचा वापर कामकाजात करता यावा यासाठी पोलिसांनी आयआयटी आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी संलग्न व्हावे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नवी दिल्लीत आयोजित, युवा पोलीस अधिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेचे उद्‌घाटन गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी आमंत्रित केले जावे अशी सूचनाही त्यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व संस्थांनी परस्पर समन्वय राखून प्रयत्न केले आणि आपापल्या क्षेत्रातील समस्या, मुद्दे आणि यशोगाथांची देवाण-घेवाण केली तर आपण देशात कायदा आणि व्यवस्था सुरळीत राखणे, दहशतवाद यासह अनेक महत्वाच्या समस्या प्रभावीपणे सोडवू शकू असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. आपल्या देशाला लाभलेल्या विशाल समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीसांच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याप्रती सरकार वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला देशभरातील 100 पेक्षा जास्त पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)