पोलिसांनी सुपारी घेवून हाताळले राजूर प्रकरण

आ. वैभवराव पिचड यांचा आरोप; न्यायालयीन चौकशीची मागणी
अकोले – कोणताही तणावाचा प्रसंग हा पोलीस प्रशासनाने कौशल्याने हाताळणे गरजेचे असते. वाद मिटवणे हे पोलीस व प्रशासनाचे काम असते. मात्र राजूर प्रकरणी राजूर पोलिसांनी “सुपारी घेवून हे प्रकरण हाताळले’ असा आरोप आ.वैभवराव पिचड यांनी केला.
राजूर प्रकरणाबाबत जी संवेदनशील भूमिका राजूर पोलिसांनी दाखवली. तीच भूमिका शेंडी प्रकरणी पोलिसांनी का दाखवली नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. राजूर प्रकरणी 307 ऐवजी 302 भादवि कलम लावण्याची गरज स्पष्ट करुन याबाबत आपण लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष ठेवून आहोत अशी पुस्तीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना जोडली.
राजूर येथे पोलीस उपाधिक्षक अशोक थोरात यांच्या समवेत गणेश स्थापनेपूर्वी शांतता बैठक पार पडली होती. त्यानंतर थोरात निघून गेल्यावर राजूरचे सहायक पोलिस निरीक्षक पप्पू कादरी यांनी शांतता समितीची बैठक पार पडली असली तरीही आगामी काळात काय होते हे आपणास दिसेलच असे सूचक विधान केले होते. आणि विसर्जन मिरवणूक प्रकरणी झालेले भांडण मिटले होते. मात्र हे मिटलेले प्रकरण रात्री दीड वाजता पोलिसांनी वाढवले असा आरोपही त्यांनी केला. राजूर व सर्व अकोले तालुक्‍यात कधीही जातीय तणावाचे प्रसंग आलेले नाहीत. याची आठवण करून देत आ.पिचड म्हणाले, शेंडी येथे एक युवक सोडणार (पूर्ण नाव नाही) याने शेंडी येथे राघोजी भांगरे यांचा विसर्जन मिरवणुकीत गाणे (पोवाडा) म्हणताना माजी मंत्री पिचड यांचा उल्लेख केला. तेव्हा भांगरे व डगळे यांच्या गटाने व जमावाने त्याला ट्रॅक्‍टरवरुन खाली खेचले. तो थेट डोक्‍यावरच पडला. तो बेशूद असून दवाखान्यात जीवन मरणाची लढाई खेळत आहे. मात्र तेथे राजूर पोलीस शांत राहतात.आणि राजूर हाणामारीला सुपारी घेवून काम करतात. याची न्यायालायीन चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल असा दावाही त्यांनी केला.
आपण सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्यात आक्षेपार्ह काहीच दिसत नाही, असे स्पष्ट करुन न्यायालयीन चौकशीत खरा प्रकार उजेडात येईलच अशी पुस्ती त्यांनी जोडली. तणाव झाला.त्याला जातीय व नंतर राजकीय वळण दिले गेले.असा आरोप करून आ.पिचड म्हणाले, मंडळापुढे नाचणारे व नंतर किरकोळ बाचाबाचीने पुन्हा एकत्र आले. तरीही याला वेगळे वळण दिले गेले. व त्याला सर्वस्वी अधिकारी कादरी जबाबदार आहेत, असा आरोप करून याबाबत लवकरच सत्य बाहेर येईल असा निर्वाळाही त्यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)