पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला आरोपी 12 तासात जेरबंद

सिंहगड आणि गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांची संयुक्त कारवाई


पत्नीच्या खून प्रकरणात अटकेत असलेला आरोपी पोलिसांना धक्काबुक्की करून शनिवारी दुपारी झाला होता फरार

पुणे- पत्नीच्या खून प्रकरणात अटकेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी 12 तासात जेरबंद केले. सिंहगड आणि गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी संयुक्तीकरित्या त्याला कोंढवा धावडे परिसरातून अटक केली.
राहुल उर्फ हृषीकेश राजेश हंडाळ (वय 22,रा.अंकुश पॅलेस, मानाजीनगर, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राहुल हा सराईत आहे. त्याने त्याची पत्नी कोमल यांचा खून केला होता. त्यानंतर त्याने पत्नीला गळफास देऊन तिने आत्महत्या केल्याची बतावणी केली होती. सिंहगड पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना शनिवारी दुपारी त्याला ससून रुग्णालयात वैद्याकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलीस कोठडीत (लॉकअप) ठेवण्यासाठी सिंहगड पोलिसांचे पथक तेथे आले होते. फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसाला धक्का मारून शिवाजी रस्त्यावरून राहुल पसार झाला होता. त्यानंतर सिंहगड पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात तो असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, विष्णू जगताप, सहाय्यक निरीक्षक जगताप, उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलीस हवालदार सुनील पवार, सचिन जाधव, रिजवान जिनेडी, प्रशांत गायकवाड, उमेश काटे, अशोक माने, दयानंद तेलंगे-पाटील, दत्ता सोनवणे, श्रीकांत दगडे, मयूर शिंदे, निलेश जमदाडे, किशोर शिंदे, हरीष गायकवाड, नीलेश कुलथे, पुरुषोत्तम गुनला यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)