पोलिओ डोसामध्ये पोलिओ जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न

file photo

नवी दिल्ली – पोलिओ प्रतिबंधासाठीच्या (ओपीव्ही) या तोंडावाटे घेण्याच्या डोसमध्येच पोलिओच्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गाझियाबादेतील औषध कंपनीतील या डोसच्या काही बॅचमध्ये “टाईप 2′ विषाणूंची वाढ झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

पोलिओ “टाईप 2′ विषाणू जगभरातून नष्ट करण्यात आला आहे. भारतातूनही या विषाणूचे उच्चाटन करण्यात आले असल्याचे समजले जात आहे. असे असताना पोलिओ डोसमध्येच विषाणूची वाढ होण्याचा प्रकार गंभीर असल्याने या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बायोमड प्रा. लि. या कंपनीकडून केवळ सरकारी पोलिओ निर्मूलनाच्या कार्यक्रमासाठीच पोलिओ डोस तयार केले जातात. या संदर्भात “द सेंट्रल ड्रग रेग्युलेटर’नी दूषित डोससंदर्भात “एफआयआर’दाखल केल्यानंतर या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक करण्यात आली आहे. या कंपनीला एकूण पाच व्यवस्थापकीय संचालक असून चौकशीसाठी उर्वरित चार संचालकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दूषित डोसचे उत्पादन, विक्री आणि वितरण पुढील आदेश मिळेपर्यंत थांबवण्याची सूचनाही देशाच्या औषध नियंत्रक महासंचलनालयाने या कंपनीला केल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील काही विद्यार्थ्यांच्या तपासणीदरम्यान या विषाणूची लक्षणे आढळली होती. त्यानंतर हे डोस फेरतपासणीसाठी पाठवले असता या डोसमध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव झाला असल्याचे उघड झाले. आरोग्य मंत्रालयाने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारांना या डोसच्या संभाव्य वापराबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)