पोलंडमधील मैदानी स्पर्धेत हिमा दासला सुवर्णपदक

नवी दिल्ली – भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिने पोलंडमधील मैदानी स्पर्धेतील 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून उल्लेखनीय यश मिळविले. भारताच्या तेजिंदरपालसिंग तूर याने गोळाफेकीत ब्रॉंझपदक पटकाविले.
हिमा हिने 200 मीटर्सचे अंतर 23.65 सेकंदात पार केले. गेले काही महिने तिला पाठीच्या दुखण्यामुळे ग्रासले होते. त्यानंतरची तिची ही पहिलीच स्पर्धा होती. गतवर्षी तिने कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेतील 400 मीटर्स शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते.

तेजिंदरपालसिंग याने 19.62 मीटर्सपर्यंत गोळाफेक केली. गतवर्षी त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत 20.75 मीटर्स अशी कामगिरी करीत सोनेरी वेध घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.