पोटे-दरेकर, शेख-खेंडके, मोटे-वाळके लढतीकडे लक्ष…

वॉर्ड क्र.4,5,व 6 चे विश्‍लेषण

अर्शद आ. शेख

श्रीगोंदा –
नगराध्यक्ष मनोहर पोटे पहिल्यांदाच शहरातून निवडणूक रिंगता उतरल्याने प्रभार्ग चारच्या निवडणुकीला महत्व आले आहे. नगरसेवक सुनील वाळके व फक्कड मोटे या दोघांच्या सौभाग्यवती समोरासमोर आल्याने प्रभाग पाचमध्ये चुरस वाढली आहे. तसेच प्रभाग सहामध्ये नगरसेवक अशोक खेंडके विरुद्ध माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख यांच्यातील बहुचर्चित लढत तालुकाभर गाजत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभाग चार मध्ये ‘अ’ मधून प्रमिला कुंभार (कॉंग्रेस) विरुद्ध वनिता संतोष क्षीरसागर (भाजप) यांच्यात सरळ लढत होत आहे. ‘ब’ मध्ये मात्र बिग फाईट आहे. नगराध्यक्ष मनोहर पोटे (कॉंग्रेस), संतोष तुकाराम दरेकर (भाजप), प्रा. बाळासाहेब बळे व राजेश सुभाष डांगे (दोघे अपक्ष) यांच्यात बहुरंगी लढत होत आहे. अपक्ष गोपाळ मोटे यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. बड्या उमेदवारांमुळे येथील लढतीला चांगलेच महत्त्व आले आहे.

प्रभाग पाचमध्ये बहुरंगी लढती आहेत. माजी नगरसेवक शहाजी खेतमाळीस (भाजप), विकास बोरुडे (राष्ट्रवादी), शिवाजी राऊत (शिवसेना), भगवान राऊत व संदीप खामकर (दोघे अपक्ष) असे पाच जण ‘अ’ मधून नशीब आजमावत आहेत. ‘ब’ मध्ये चांगुणाबाई खेतमाळीस या ज्येष्ठ महिलेला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. अलका फक्कड मोटे (राष्ट्रवादी), मनीषा सुनील वाळके (भाजप), सुजाता भगवान राऊत व रोहिणी अंबादास मखरे (दोघी अपक्ष) असा सामना येथे रंगला आहे. मोटे विरुद्ध वाळके ही येथील पारंपरिक लढत चर्चेचा विषय झाली आहे.

प्रभाग सहामध्ये ‘अ’ मधून वैशाली आळेकर (राष्ट्रवादी) व मनीषा महेश लांडे (भाजप) यांच्यातस सरळ लढत होत आहे. आळेकर दुसऱ्यांदा नशिब आजमावत आहेत. ‘ब’मध्ये अशोक खेंडके (भाजप) विरुद्ध अख्तर शेख हा पारंपरिक सामना रंगला आहे. दोघे विद्यमान नगरसेवक आहेत. शेख हे चौथ्या विजयासाठी सज्ज असून, खेंडके हे शेख यांचा विजयी वारू रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. संभाजी ब्रिगेडचे उमेदवार अब्दुलरहीम जकाते रिंगणात आहेत. उभय लढतीत उमेदवारांपेक्षा भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रभाग चारमध्ये 2268 मतदार आहेत. महंमद महाराज मठ, रविवार पेठ, पोलीस लाईन, पंतनगर, कैकाडी गल्ली, पंचायत समिती परिसर या प्रभागात येतो. प्रभाग पाचची मतदार संख्या 2590 आहे. गणेशनगर, बोरुडे मळा, दरेकरवस्ती, वेताळवाडी, जम्बोबेट, जावईनगर, डाके मळा या प्रभागात आहेत. प्रभार्ग सहा मध्ये 2832 मतदार आहेत. भाजी मंडई, नामदेव मंदिर, बोरुडगल्ली, कॅनरा बॅंक आदी या प्रभागात येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)