पॉर्न साईटस ब्लॉक न केल्यास परवाना रद्द करा

उच्च न्यायालय : केंद्र सरकारला अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
नैनिताल – डेहराडून येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पॉर्न वेबसाइटस ब्लॉक करण्याच्या अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी निर्देशांचे उल्लंघन केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 25 अंतर्गत परवाना रद्द होईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पॉर्न क्‍लिप्सपाहून विद्यार्थ्यांनी पीडित मुलीवर बलात्कार केला अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मुख्य न्यायमूर्ती राजीव शर्मा आणि न्यायमूर्ती मनोज तिवारी यांनी हे निर्देश जारी केले आहे. पॉर्न साइटसचा मुलांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे या पॉर्न साइटसवर नियंत्रण आणणे, त्या ब्लॉक करणे आवश्‍यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे. डेहराडून येथील शाळेत चार मुलांनी 10 व्या इयत्तेतील विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंटरनेटवर पॉर्न क्‍लिपपाहून आपण बलात्कार केल्याचे या मुलांनी पोलीस चौकशीत सांगितले होते. पॉर्न साइटसवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी अधिसूचना जारी केली होती. त्याचे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. 31 जुलै 2015 रोजी केंद्र सरकारने पॉर्न साइटस ब्लॉक करण्यासंबंधी अधिसूचना जारी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)