पैसै न दिल्याने चाकूने मारहाण

श्रीगोंदे – पैसे मागूनही न दिल्याने शिवीगाळ करीत चाकूने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याप्रकरणी संदीप काळकुशा काळे व शेऱ्या संदीप काळे (दोघे रा. भानगाव) यांच्यावर श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भरत शिवराम वागस्कर (रा. सुरोडी)यांनी फिर्याद दाखल केली आहे.
वागस्कर सुरोडी शिवारात कुटुंबासह राहतात. भानगाव शिवेलगत नामदेवपट्टी शिवारात त्यांची शेतजमीन आहे. या जमिनीच्या शेजारी संदीप काळे हे त्याच्या बायको मुलासह एकत्र राहतात. 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता नामदेवपट्टी शिवारातून मोटारसायकलवर घरी येत असताना संदीप काळे हा दारू पिऊन येऊन आला आणि त्याने पैसे मागितले. पैसे दिले नाही, म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. त्याला विरोध केल्याने त्याच्या हातातील चाकूने छातीवर, डाव्या हातावर मारहाण करून दुखापत केली. त्या वेळी भरतने त्याचा चुलत भाऊ मनोहर पांडुरंग वागस्कर आणि संतोष जयसिंग वागस्कर यांना फोन करून बोलावून घेतले. त्यामुळे त्याच्यासोबतच्या महिलेने अंगावरील कपडे काढून शिवीगाळ केली. आम्ही आमच्या घराकडे पळत गेलो; मात्र माझी मोटारसायकल तेथेच उभी होती. त्यांनी माझ्या मोटारसायकलकर दगड घालून तिचे नुकसान केले आहे, असे वागस्कर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)