पेरणे फाटा बंद

वाघोली- पेरणे फाटा येथे महाराष्ट्रभर होत असलेल्या सखल मराठा मोर्चाला आरक्षण मिळावे यासाठी समस्त ग्रामस्थ आणि इतर समाजाच्या वतीने लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना शांततेत निवेदन देण्यात आले. यावेळी पेरणे गाव आणि पेरणे फाटा शांततेत बंद ठेवण्यात आला. यावेळी निवेदन देताना अष्टापूर गावचे माजी सरपंच सुभाष जगताप, पेरणेगावचे सरंपच रूपेश ठोंबरे, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली वाळके, माजी उपसरंपच बापुसाहेब कदम, सदस्य रवींद्र वाळके, दादासाहेब माने, तुळापूरचे सरपंच अमोल शिवले, गणेश पुजारी, दीपक वाळके, विक्रम गायकवाड, मधुकर वाळके, शिवाजी वाळके, अतुल वाळके, माजी उपसरंपच शिवाजी पंडित वाळके, दत्ता वाळके, सागर तळेकर, पोलीस पाटील विशाल कदम, लोणीकंद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणासाहेब टापरे, पोलिस कर्मचारी बाळासाहेब गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)