पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यास काँग्रेसचा विरोध : मुनगंटीवार

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरातील जनता वाढलेल्या इंधन दरांमुळे हैराण झाली आहे. इंधनाचे दररोज एक नवा उच्चांक गाठत असून यामुळे सामान्य माणसाचे ‘बजेट’ पूर्णपणे कोलमडले आहे. दरम्यान वाढत्या इंधन दरवाढीवरून आता केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारला विरोधकांसह जनतेनेही चांगलेच धारेवर धरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आज भाजपाचे महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इंधन दरवाढीबाबत वक्तव्य केले आहे. मुनगंटीवार म्हणतात की “इंधनाचे वाढते भाव ही निश्चितच चिंताजनक बाब आहे, परंतु राज्य सरकारने जर इंधनाचे भाव एक रुपयाने जरी कमी केले तरी सरकारला २२०० करोड रुपयांच्या वार्षिक महसुलास मुकावे लागेल.”
यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी आणखीन एक दावा केला, ते म्हणाले “आमचा पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यास पाठिंबा आहे मात्र काँग्रेसचे राज्य असणाऱ्या राज्यांचा यास विरोध आहे. या राज्यांना असं वाटत की इंधन जीएसटीच्या अख्यारीत आल्यास आपले वित्तीय स्वातंत्र्य लोप पावेल”
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)