पेट्रोल-डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट ही जनतेची चेष्टा – राहुल गांधी

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात ही जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन याआधीही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. मात्र, आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात केल्याने राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन ही जनतेची क्रूर चेष्टा असल्याची टीका केली.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशातील सर्व नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर, महागाई आकाशाला भिडली आहे. असे असताना दर कमी करण्याची ही पद्धत आहे का? असे असेल तर हा अतिशय बालिशपणा आणि जनतेची क्रूर थट्टा आहे. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला तेलाचे दर कमी करण्याचे आव्हान दिले होते. मात्र फक्त 1 पैशांनी दर कमी करून तुम्ही ते आव्हान अजून स्वीकारलेले नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/RahulGandhi/status/1001741650220249088

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)