पेटलेला कचरा उठला जीवावर

शिरूर-शिरूर शहरात हुडको वसाहतीजवळ असणाऱ्या नगर परिषद कचरा डेपोला शनिवारी (दि. 21) अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात आगीचे डोंब व धूराचे लोट निघाल्याने हुडको वसाहत व बाबुराव नगर परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागले आहे. तर हा कचरा डेपो हटवावा, अशी मागणी नागरिकांनामधून होत आहे. परंतु शिरूर नगर परिषद लोकप्रतिनिधी, शिरूरचे आमदार, नगराध्यक्ष सर्वचजण याबाबत मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्‍त केला. तर महिना दोन महिन्यांला या कचरा डेपोला आग लागते कशी? याबाबत नगरपरिषद अनभिज्ञ आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊन सुधा या कचरा डेपो बाबत योग्य निर्णय का घेत नाही, असा सवाल विचारला जात आहे.
अचानक या कचरा डेपोला आग लागली. ही आग येवढी मोठी होती की शहराच्या अनेक भागातून दिसत होती. धूराचे लौट यामुळे पुणे-नगर बाह्यमार्ग व हुड्‌को वसाहत, बाबुराव नगरमध्ये धुराचे लोट पसरले होते. आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या कार्यालयात ही आज धूर पाहायला मिळाला. यामुळे भर उन्हात नागरिक धुरामुळे त्रासलेला दिसत होता. येथील नागरिकांना वाहने चालविण्यास त्रास होत होता. तर धुरामुळे श्वसनास व डोळ्यात जळजळ होत होती.
नागरिकांची मागणी रास्त असली तरी शिरूर शहराचे क्षेत्रफळ कमी असून एका बाजूला नदी आहे. तर दुसऱ्या बाजूला शिरूर व रामलिंग यागावच्या ग्रामपंचायत हद्द असून या हद्दीजवळ हा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोसाठी या भागात कचरा डेपोसाठी नगरपालिका सभागृह नेते व शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष स्व. केशरसिंग परदेशी यांनी जागा पाहिली होती. परंतु कचरा डेपोसाठी नाहरकत देण्यास या ग्रामपंचायतीने नकार दर्शवला होता. त्यामुळे जागा उपलब्ध झाली नाही. शिरूर नगरपरिषद भविष्यात या दोन्ही ग्रामपंचायत सामील होतील. त्याचा विचार करून कचरा डेपोसाठी आज जागा उपलब्ध केली. तर त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. परंतु याकडे लक्ष देणार कोण हे मात्र अनुत्तरित आहे. जोपर्यंत सगळ्यांच्या संगनमताने नवीन जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत नगरपरिषदेकडे दुसरा पर्याय नसणार आहे.
रात्री अपरात्री या धुरामुळे संपूर्ण परिसर व्यापला जात आहे. घराघरांत धूर जात आहे यामुळे झोपेत एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. नागरिकांच्या जीवावर हा पेटलेला कचरा डेपो उठू शकतो. परंतु याबाबत कोणीच जागरूक व गंभीर नाही हे भयावह आहे. हा कचरा डेपो आहे. त्यासमोर आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कार्यालय असून महिना दोन महिन्यांतून हा कचरा डेपो पेट घेतो आणि दोन ते तीन किलोमीटरचा परिसर व्यापून जात आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोकाही आहे. तसेच यामुळे अनेक आजार नागरिकांना झाले आहेत. परंतु आमदार याबाबत ठोस निर्णय का घेत नाही हा संशोधनाचा विषय आहे.

  • नगर परिषदेला गांभीर्य नाही
    शिरूर शहरातील रोजचा अंदाजे वीस ते पंचवीस टन कचरा हा या कचरा डेपोत जमा होत आहे. दररोजच्या कचऱ्याच्या मानाने ही जागा अपुरी पडत आहे. त्यात शहराच्या मध्यवस्तीत व शाळेच्या कॉलेजच्या जवळ आहे. या कचरा डेपोला अनेकवेळा आग लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूराचे लोट निघाल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. शिरूर नगर परिषद प्रशासनाला याबाबत गांभीर्यही नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. हा कचरा डेपो हटवावा अशी मागणी होत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)