पॅलेस्टाईन नेत्याने संयुक्तराष्ट्रांत ट्रम्प यांच्यावर केली घणाघाती टीका

संयुक्तराष्ट्रे – पॅलेस्टाईनचे नेते मेहमुद अब्बास यांनी संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यपुर्वेकडील देशांच्या भूमीकेवर सडकून टीका केली. मध्यपुर्वेकडील देशांच्या सध्याच्या समस्येच्या बाबतीत संयुक्तराष्ट्रांकडेच केवळ मध्यस्थीची भूमिका असावी ही संकल्पना अमेरिकेने धुडकाऊन लावली. त्यांच्या या भूमिकेला अब्बास यांनी विरोध दर्शवला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे वॉशिंग्टनचे कार्यालय बंद पाडले. त्यांनी जेरूसलेमला इस्त्रायलच्या राजधानीचा दर्जा घोषित केला, एवढेच नव्हे तर पॅलेस्टाईनला दिला जाणारा मदत निधीही त्यांनी कमी केला आहे. त्यांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाच्या स्थितीवर जो उपाय सांगितला आहे तो आम्हाला मान्य नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन्ही देशांनीच आपसात बसून आपल्यातील संघर्षावर तोडगा काढावा असे ट्रम्प सांगतात पण त्यांनी उघडपणे इस्त्रायलची भूमिका उचलून धरून आमच्यावर अन्याय केला असून आता तर त्यांनी या संघर्षाच्या स्थितीत संयुक्तराष्ट्रांनाही त्यांची भूमिका बजावण्याला एका अर्थाने मज्जावच केला आहे. अमेरिकेची मध्यस्थी आम्ही आता मान्य करणार नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

अब्बास यांनी आपल्या चाळीस मिनीटांच्या भाषणात आपला सारा रोख अध्यक्ष ट्रम्प यांच्या अडेल भूमिकेवर टीका करण्यासाठीच ठेवला होता. मध्यपुर्वेतील शांतता आणि स्थैर्य अबाधित ठेवायचे असेल अध्यक्ष ट्रम्प यांनी आपला तेथील हस्तक्षेप कमी करावा असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)