पृथ्वीराज चौहानच्या रोलमध्ये सनी ऐवजी अक्षय कुमार

पृथ्वीराज चौहान यांचा रोल सनी देओल साकारणार असल्याचे काही काळापूर्वी समजले होते. मात्र आता हा रोल अक्षय कुमार साकारणार आहे. सनीने पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिक प्रोजेक्‍ट का सोडला, हे मात्र समजू शकलेले नाही. त्याला एखाद्या पिरीएड फिल्ममध्ये काम करायला आवडले असते. त्यासाठी तो स्वतःदेखील उत्सुक होता. सनीचा “यमला पगला दीवाना फिर से’ पण रिलीज होणार आहे. त्यामध्ये सनी, बॉबी आणि पप्पा धर्मेंद्र यांच्याबरोबर कृती खरबंदा हे लीड रोलमध्ये असणार आहेत.

याचा पहिला भाग “यमला पगला दीवाना’ पण प्रेक्षकांना खूप आवडला होता. पण त्याचा दुसरा भाग “यमला पगला दीवाना 2′ मात्र प्रेक्षकांना अजिबात आवडला नव्हता. आता याच सिरीजमधील तिसऱ्या सिनेमाकडे सनीला अधिक लक्ष केंद्रीत करायचे आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकला नकार देण्यामागचे ते एक कारण असू शकते. यशराज बॅनरखाली बनणाऱ्या या मेगा बायोपिकचे डायरेक्‍शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. जरी सनीने हा सिनेमा सोडला असला तरी अद्याप अक्षय कुमारने हा रोल करण्याबाबत कोणताही दुजोराही दिलेला नाही, हे ही लक्षात घ्यायला हवे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)