पूरग्रस्त केरळमुळे मसाला “तिखट’

पिंपरी – केरळला बसलेल्या पुराच्या फटक्‍यामुळे जेवणातील महत्त्वाचा घटक असलेल्या गरम मसाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे गरम मसाल्याच्या दरवाढीचे “तिखट’ सामान्य ग्राहकांना झोंबणार आहे.

केरळ राज्यातील महापुरामुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले होते. आता परिस्थिती सुधारत असली तरी या महाप्रलयाच्या फटक्‍यातून लवकरात लवकर सावरणे केरळला शक्‍य नाही. यंदा केरळ, कर्नाटकमधून मसाल्याची आवक जास्त झाल्याने तीन महिन्यांपूर्वीच मसाल्याच्या दरात प्रचंड घट झाली होती. आधी मसाला विलायची 1800 रूपये किलो होती. तिचे भाव सध्या 1000 ते 1100 रूपये किलो आहे. काळी मिरीचे भाव तीन महिन्यांपूर्वी 800 रूपये किलो होते. ते 600 रूपयांवर आले आहे. तर दालचीनीचे भाव देखील 440 रूपये किलो झाले आहे. परंतु, केरळात आलेल्या पुराने तेथील मसाल्याची शेती उद्धवस्त झाल्याने तेथून आवक घटली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईतील वाशीच्या मसाला बाजारात मसाल्याची आवक घटल्याने काही मसाला पदार्थाचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यात प्रामुख्याने दालचिनी, काळी मिरी आणि खोबऱ्याचे भाव वधारण्याची शक्‍यता आहे. हे मसाल्याचे पदार्थ केरळमधून येतात, या पदार्थांना विदेशात देखील मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगतिले. तसेत जायफळ, लवंग, तेजपत्ता, जावेत्री या मसाल्याच्या पदार्थाची लागवड ही केरळमध्येच होते. काही व्यापाऱ्यांनी त्यांचा माल गोदामात ठेवल्याने काही प्रमाणात माल महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही पाठवला जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

महाराष्ट्रात श्रावण महिन्यासोबत सणवार सुरु होतात. त्यामुळे मसाला पदार्थांची मागणी देखील वाढत आहे. मात्र, पुरवठा कमी झाल्याने मसाल्याचे भाव आवाक्‍याच्या बाहेर जाण्याची शक्‍यता आहे. केरळ, कर्नाटक बरोबरच मध्यप्रदेशमध्येही मसाल्याचे पदार्थ घेण्यात येतात. परंतु, मध्य प्रदेशच्या मसाला पदार्थाला ग्राहक कमी आहेत. कोकण आणि केरळमधून शहरात खोबऱ्याची आवक होते असते. मात्र, केरळमधील परिस्थितीमुळे कोकणातून नारळाला मागणी वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने खोबरे आणि त्यापासून तयार होणाऱ्या तेलावरही पडणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या दोन्हीचे भाव वाढण्याची शक्‍यता असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)